नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यावर अंत्यसंस्कार

पनवेल : वार्ताहर

अपघाती निधन झालेल्या पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्यावर शुक्रवारी (दि. 4) मध्यरात्री दोनच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अमरधाम स्मशानभूमीत लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुग्धा लोंढे यांच्या अकाली मृत्यूचे वृत्त कळताच अंत्यदर्शनासाठी रीघ लागली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, शहराध्यक्ष जयंत पगडे, विस्तारक अविनाश कोळी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजप मंडल, युवा मोर्चा, महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले.

दरम्यान, या अपघातप्रकरणी मारुती स्वीफ्ट गाडीचालक रचना किशोर करवले (36, रा. साईनगर-पनवेल) यांच्याविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी भादंवि कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा मानसिक धक्का बसल्याने त्यांना बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Check Also

Jedes Online Spielbank wird beflei?igt, stets neue Fans anzuziehen

Nahe den Freespins eignen zudem mehr als einer weitere Optionen gebraucht, um Neukunden nach vollbringen …

Leave a Reply