Breaking News

मोहोपाडा हद्दीत नऊ रुग्ण आढळले

मोहोपाडा : प्रतिनिधी – वासांबे (मोहोपाडा) हद्दीत गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून बुधवारी (दि. 1) नव्याने नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

वासांबे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने मोहोपाडा दोन रुग्ण, नवीन पोसरी एक, आली आंबिवली एक, गणेशनगर तीन, चांभार्ली एक तर वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील वाशिवली एक असे नऊ कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून इतर परिसरातील कोरोना रुग्ण संख्या वगळता फक्त वासांबे मोहोपाडा हद्दीत सध्या 39 रुग्ण आढळले आहेत. तर कांबे येथील एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आल्याचे समजते. मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण वाढीने जोर धरल्याने ग्रामपंचायतीने सतर्कता बाळगली असून 2 ते 5 जुलैपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply