पनवेल : वार्ताहर
पनवेल विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत मागे घेत असल्याचे शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सोमवारी
(दि. 7) सांगितले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना नेते बबन पाटील यांनी पनवेल मतदारसंघातून पक्षाच्या वतीने व अपक्ष म्हणून असे दोन अर्ज दाखल केले होते. ए, बी फॉर्म सादर न करता आल्याने त्यांचा मुख्य अर्ज बाद झाला, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार अपक्ष म्हणून भरलेला अर्जसुद्धा मागे घेऊन युतीचा धर्म पाळला, असे पाटील यांनी सांगितले.