Breaking News

‘ईडी’च्या कारवाईबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ

वाधवान बंधूंच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर कारवाई

अलिबाग : प्रतिनिधी

पंजाब आणि महाराष्ट्र  बँक (पीएमसी) प्रकणात अडकलेल्या राकेश आणि सारंग वाधवान यांच्या अलिबागमधील आवास येथील फार्म हाऊसवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी (दि. 7) छापा टाकला. वाधवानच्या जवळचे सहकारी कोण होते याचा शोध ईडी घेत आहे, मात्र या कारवाईबाबत जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासन अनभिज्ञ आहे. राकेश व सारंग वाधवान यांचा अलिबाग तालुक्यात आवास सासवणे या ठिकाणी फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसच्या परिसरात अनेक वस्तू आढळून आल्या आहेत, तसेच बंगल्याच्या आवारात कार आणि अन्य गाड्या आढळल्या आहेत. यापैकी एक कार कर्नाटकमधील असून दोन कार या पेण, रायगड आणि ठाणे येथील आरटीओ कार्यालयात पासिंग केलेल्या आहेत, तसेच ईडीच्या छाप्यात मालदीवमधील एक याट आणि एअरक्राफ्टही आढळून आले. बंगल्याच्या आवारात सापडलेल्या कार या सारंग आणि राकेशकुमार वाधवान यांच्या नावावर आहेत, तर कर्नाटक पासिंगची कार ही हाऊसिंग डेव्हलपरच्या नावावर दिसत आहे. पीएमसी प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीने आतापर्यंत दोन ठिकाणे शोधली आहेत. वाधवानच्या जवळचे सहकारी कोण होते याचा शोध घेण्यात येत आहे.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply