Breaking News

महेश बालदी विरोधकांची शिटी वाजविणार -सरपंच पूनम महेश कडू

उरण ः रामप्रहर वृत्त

कार्याशी तत्पर असणार्‍या भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी 190 उरण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवण्याचे काम केले होते.परंतु विरोधकांचे हे मनसुबे उधळून लावत आपला उमेदवारी अर्ज महेश बालदी यांनी कार्यर्कत्यांच्या आग्रह खातर व जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने उरणच्या विकासासाठी कायम ठेवत निवडणुकीला सामोरे जाण्याचा एकमुखी निर्णय घेतल्याने आता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे, असे प्रतिपादन सोनारी गावच्या सरपंच पूनम महेश कडू यांनी व्यक्त केले आहे.

सरपंच पूनम कडू यांनी सांगितले की, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या माध्यमातून अनेक वर्षे अंधारात चाचपडत पडलेल्या घारापुरी बेटावर विद्युत रोषणाई करण्याचे महान काम केले आहे. तसेच तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत दास्तान फाटा येथे विश्वातील पहिले शिवसमर्थ स्मारक उभारण्याचे काम केले आहे.

    यासह उघड्यावर शौचाला जाणार्‍या आया बहिणीसाठी शौचालय, जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून रस्त्याचे काँक्रीटीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण,उरण नगर परिषद हद्दीत अनेक विकास कामे, कोळी समाजासाठी सुसज्ज जेटीसह इतर अनेक जनहिताचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम कोणत्या ही प्रकारे जाती पातीच राजकारण न करता हाती घेतले आहे.तसेच उरणकरांचा अतिमहत्वाचा अत्याधुनिक रुग्णालयाचा रेंगाळत पडणारा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेतले असल्याने उरणकरांचे नेतृत्व महेश बालदी यांनी करण्यासाठी निवडणूकीला समोरे जावे, अशी हाक  कार्यकर्त्यांनी दिली. त्या कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर महेश बालदी हे कोणत्याही प्रकारचे जाती-पातीचे राजकारण न करता मी या मतदार संघाचा,या मतदार संघातील जनता माझी हे एकच ब्रीद वाक्य आत्मसात करून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे महेश बालदी यांच्या जनमानसात वाढत्या प्रभावाचा धसका घेतलेल्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सध्या सरकू लागली असल्याचे चित्र गावा गावात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे 24 आँक्टोबर रोजी महेश बालदी हे निश्चित जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने व कार्यकर्ते यांच्या एकदिलाने सुरू असणार्‍या प्रचारानी विरोधकांची शिटी ही आपल्या शिटी या निशाणीच्या माध्यमातून वाजवणार हे मात्र खरे आहे, असा विश्वास शेवटी सरपंच पुनम कडू यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply