Breaking News

सुपेगावमधील जुगाराचा अड्डा उद्ध्वस्त

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील तळेगाव हद्दीमधील सुपेगाव रस्त्यालगत असलेल्या पडीक वाड्यातील जुगाराच्या अड्ड्यावर  रेवदंडा पोलिसांनी कारवाई करून तो उद्ध्वस्त केला. या कारवाईत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार रेवदंडा पोलीस ठाण्याचे  निरीक्षक सुनील जैतापूरकर, हवालदार श्रीकांत म्हात्रे, संतोष गायकवाड, प्रमोद देसाई, पोलीस नाईक सुशांत भोईर, धर्मेंद्र म्हात्रे, शिपाई संजय ढवळे  यांनी बुधवारी (दि. 9) दुपारी सुपेगाव रस्त्यालगत असलेल्या पडीक वाड्यावर धाड टाकली. या वेळी वसंत रामा वाघीलकर (वय 48, रा. तळेगाव), नारायण महादू पाटील (वय 58, रा. दिव), महादेव नारायण पाटील (वय 35, रा. ताडवाडी) व नारायण गोविंद ठाकूर (वय 72, रा. टोकेखार) या चार जणांना विनापरवाना तीनपत्ती जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडील पाच हजार रुपये रोख आणि जुगाराचे विविध साहित्य पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार श्रीकांत म्हात्रे हे करीत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply