Breaking News

पनवेलमध्ये कामगारवर्गही महायुतीच्या पाठीशी, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा मेळाव्यात निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जय भारतीय जनरल कामगार संघटना, वंदे मातरम् रिक्षा व टॅक्सी संघटना आणि रायगड जिल्हा भाजप कामगार आघाडीच्या वतीने रविवारी (दि. 13) कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार कामगारांनी केला.या कामगार मेळाव्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची  प्रमुख उपस्थिती लाभली, तर भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, कोन ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, सरचिटणीस मोतीराम कोळी, कार्यालयीन सचिव समिरा चव्हाण, कामगार आघाडीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, अरुण गोडसे, जगदिश म्हात्रे, शैलेश पाटील, रवींद्र कोरडे आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply