Breaking News

मुरूड राजपुरीतील शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुरूड : प्रतिनिधी

तालुक्यातील राजपुरी हे गाव पूर्वी संपूर्ण शेकापचे होते. मात्र अलिकडच्या काळात येथील शेकापचे काही कार्यकर्ते भाजपमध्ये गेले तर बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 18) शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी मुरूडच्या नगराध्यक्ष स्नेहा पाटील, पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे, नगरसेवक विजय पाटील, राजपुरीचे सरपंच नौशाद चोगले, माजी सरपंच मनोज कामाने, शिवसेनेचे विजय कावळे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, मुरूड शहरप्रमुख अशील ठाकूर, युवासेना प्रमुख कृणाल सात्विस्कर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने देशात विकासाची गंगा आणली आहे व त्याचा तळागाळातील जनतेला फायदा होत आहे. म्हणूनच युवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करीत आहेत.

-महेंद्र दळवी, शिवसेना नेते, अलिबाग

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply