अलिबाग ः प्रतिनिधी
येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून एकूण 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.
अलिबागमधील करोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या अलिबाग तालुक्यात आहेत. एक हजार 212 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यात सोमवारी (दि. 12) आणखी 101 जणांची भर पडली. चिंताजनक बाब म्हणजे यात जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैदी व कर्मचारी मिळून 69 जणांचा समावेश आहे. त्यांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या या सर्वांना नेऊली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. बहुतांश रुग्णांना कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीत उपचार सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …