मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच नेते भाजप किंवा शिवसेनेत यायला तयार होते. अनेक काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांनी आम्हालाच निवडले होते, पण अनेकांना आम्ही हात जोडून सांगितले की, तुम्ही आहात तिथेच राहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य सहकारी बँक घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, एफआयआर दाखल झाल्यानंतर ईडीने ती सगळी नावे त्या यादीत समाविष्ट केली. ईडीची यादी येताच विरोधकांनी बोंब ठोकणे सुरू केले की, आमच्या विरोधात सरकार काम करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची इमेजच करप्ट आहे की त्यांच्याबाबत लोकांना नवल वाटत नाही.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …