Breaking News

निधवली निफाडच्या जंगलात भेकराची हत्या

पेण : प्रतिनिधी 

तालुक्यातील निधवली निफाड येथील जंगलात गस्त घालणार्‍या वनपाल व कर्मचार्‍यांना भेकर जातीच्या वन्य प्राण्याची हत्या झाल्याचे आढळून आले. याबाबत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होलिकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रपाल पी. आय. गायकवाड यांच्या आदेशानुसार पेण तालुक्यातील निधवली निफाड जंगलात वनपाल ए. एन. काटकर व वनरक्षक एस. ए चव्हाण हे गस्त घालीत होते. ते निफाड येथील राखीव वन अर्पाटमेंट नं 490 च्या लगत असणार्‍या मालकी क्षेत्रात आले असता, त्यांना एक भेकर मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी त्या मृत भेकराचा   पंचनामा करून, त्याला पेण येथील पशवैद्यकीय रूग्णालयात  आणले आहे. तेथे भेकराचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर वनकर्मचारी वसाहतीच्या आवारात पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्या सक्षम मृत भेकराची विल्हेवाट लावण्यात आली.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply