Breaking News

विरोधकांनी पेण मतदारसंघाला मागे नेण्याचे काम केले

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा आरोप; महायुतीची दणदणीत प्रचारसभा

पेण : प्रतिनिधी

येथील शेकाप आमदाराने गेल्या 10 वर्षांत पेण विधानसभा मतदारसंघ मागे नेण्याचे काम केले असून, मोर्चे व आंदोलने करून लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम त्यांनी केले आहे, असा आरोप नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी पेण येथील प्रचारसभेत केला. पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ पेणमधील गोळीबार मैदान येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. स्थानिक आमदाराने या मतदारसंघासाठी काय केले? शासनाची कोणती योजना तरुण, बेरोजगार युवकांसाठी राबविली? रोजगार मेळावे कधी घेतले का? असे सवाल प्रीतम पाटील यांनी उपस्थित केले आणि शेकाप आमदाराला सामान्य जनतेशी काही देणेघेणे नसून फक्त आपला स्वार्थ साधण्याचेच काम त्यांनी केले, अशी टीका केली. बाळगंगा धरण, रिलायन्स गॅस प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचा मुद्दा, पेण अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांवर लोकांच्या भावनांशी खेळून आंदोलने, मोर्चे काढून लोकांची दिशाभूल करण्याचे काम आमदारांनी केले, असा आरोप प्रीतम पाटील यांनी या वेळी केला. ज्या वेळी पेणमधील नागरिकांनी नगर परिषदेची सत्ता आमच्या हातात दिली तेव्हापासून रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली या शहरात विकासकामांचा धडाका लावला असून, रिंग रोडची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भरघोस निधी आणण्याचे काम केले आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून शहरातील मोतीराम तलाव येथे भुशी डॅमच्या धर्तीवर प्रकल्प राबविण्यात आला आहे. शहरातील डम्पिंग ग्राऊंड शहराबाहेर नेण्याचे काम केले, असे नगराध्यक्षा पाटील यांनी सांगितले. नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस बंडू खंडागळे, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, उपाध्यक्ष अजय क्षीरसागर, नाना पवार, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा दीपश्री पोटफोडे, नगरसेवक सुहास पाटील, राजेश म्हात्रे, निवृत्ती पाटील, नलिनी पवार, शहनाज मुजावर, देवता साकोस्कर, वैशाली कडू, प्रशांत ओक, माजी नगरसेवक प्रकाश पाटील, दिलीप लाड, शिवसेना शहरप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगरसेविका अरुणा पाटील, प्रतिभा पाटील, धनश्री समेळ, रवींद्र म्हात्रे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या प्रचारसभेला उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply