Breaking News

प्रमोद भगत कार्यकर्त्यांसह भाजपत दाखल

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सुकापूर येथील शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भगत यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापला जोरदार हादरा बसला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये शुक्रवारी (दि. 18) जाहीर पक्षप्रवेश केला. सुकापूर येथील शेकापच्या पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद भगत, सुरज भगत, बळीराम भगत, शंकर आत्माराम, अनिल पवूळकर, संतोष भिंगारदिवे, संजय सुतार, विकी पालकर, ॠषिकेश पाटील, सतीश माळी, संदेश पारवे, समाधान गायकर यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीचे कमळ हाती घेतले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, चाहुशेठ पोपेटा, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एकनाथ भोपी, दत्ता भगत, अशोक पाटील, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, आलुराम केणी, ज्ञानेश्वर पाटील, राजेश पाटील, पांडुशेठ केणी, चंद्रकांत केणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहदर आदिवासीवाडीतील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती सुरूच आहे. त्याअंतर्गत शिरवली ग्रामपंचायतीतील मोहदर आदिवासीवाडीतील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मोहदर आदिवासी वाडीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे. माजी खासदास लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पनवेल येथील निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे गु्रप ग्रामपंचायत शिरवली येथील मोहदर आदिवासी वाडीतील एकनाथ हिंदोले, सुकर्‍या कुर्‍हाडी, सोमा हिंदोले, बुधाजी भगत, सागर भगत, सुकर्‍या पारधी, रमेश भोकरे, मंगल भगत, दिलीप हिंदोले, लहु हिंदोले, रवी चौधरी, किसन कांबडी यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शिवाजी दुर्गे, तुकाराम पाटील, लक्ष्मण पाटील, संजय भगत, महादेव गडगे, तुषार दुर्गे, रवी गोंधळी, प्रदीप कतारे, नागा पारदी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेकापच्या गडगे कुटुंबीयांनी हाती घेतले ‘कमळ’

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश हे दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याअंतर्गत मोर्बे येथील शेकापच्या गडगे कुटुंबीयांनी शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेलमधील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी मोर्बे येथील शेकापच्या बाळाराम गडगे, काळुराम गडगे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे बाळाराम उसारकर, परशुराम नावडेकर, रामदास म्हात्रे, रमेश नावडेकर, भास्कर नावडेकर, पामदास फडके, जीवन नावडेकर, जनार्दन भगत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

वारदोली, माची प्रबळमध्ये शेकापला धक्का

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वारदोली, तारटेप ठाकूरवाडी, हालटेप ठाकूरवाडी, मिसळवाडी, माची प्रबळ येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शुक्रवारी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षाची शाल देत पक्षात स्वागत केले. पनवेल येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी शेकापचे वारदोली तारटेप ठाकूरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विकास भवर, बाळू ठाकरे, भाऊ वाघ, रामदास खडके, भरत भुंमाबरे, हरेश वीरा, राघो उघडा, नामदेव शिद, महेश पाटील, जयवंत ढुमणा यांच्यासह अनेक कार्यकर्ते हालटेप ठाकूरवाडी येथील सुनील शिंगवा, प्रकाश उघडा, मिसळवाडी येथील हरिभाऊ मिसाळ, राधाबाई मिसाळ, चेतन मिसाळ, दर्शना मिसाळ, काशिनाथ दिसले, कविता दिसले, राजेंद्र मिसाळ, अर्चना मिसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला, तसेच माची प्रबळ येथील पांडुरंग पारधी, जया पारधी, देहू पारधी, नामी पारधी, जनी पारधी, अशोक पारधी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.  टी. देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वारदोलीचे उपसरपंच जगदिश केंगे, बेलवलीचे माजी सरपंच भरत पाटील, संजय गायकर, वारदोलीचे माजी सरपंच पंढरीनाथ पाटील, उपसरपंच नारायण भोपी, संतोष पाटील, अरुण पाटील, नामदेव भुतांबरा, जितेंद्र बताले यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply