मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. यातच बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात. मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील गोष्टी एवढ्या पुढे
गेल्या की एकमेकांच्या कुटुंबीयांनीही भेट घेतली.
भारतीय संघ सध्या पुढच्या वर्षी भारतात होणार्या टी-20 वर्ल्ड कपची तयारी करीत आहे. या सगळ्यात भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागला आहे. हार्दिक आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक यांच्यात जवळचे संबंध आहेत. याआधी हार्दिकचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, पण आता हार्दिक आणि नताशा हे दोघे लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहेत.
स्टॉपबॉय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार हार्दिक आणि नताशा यांच्यातील नाते पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे हार्दिकने आपल्या परिवारासोबत नताशाची भेट घडवून आणली. महत्त्वाचे म्हणजे या रिपोर्टनुसार हार्दिकच्या घरचे या दोघांच्या लग्नासाठी तयार आहेत.
भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या एका सोशल मीडियावरील पोस्टवर आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. एवढेच नाही तर नव्या गर्लफ्रेंडविषयी हार्दिक गंभीर असून, त्याने नताशाची कुटुंबीयांसोबत भेटही घडवून आणली. त्यामुळे सध्या पांड्या या नव्या नात्याबाबत खूश असल्याचे दिसत आहे.
कोण आहे नताशा?
नताशा मूळची सर्बियाची आहे. वयाच्या तिसर्या वर्षीपासून तिने डान्स शिकायला सुरुवात केली. ‘नच बलिए 9’मध्ये तिने सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर बॉलीवडूमध्ये नताशाने एण्ट्री केली ती ‘डॅडी’ या चित्रपटात एका आयटम साँगवर थिरकत. तिच्या याच अदांवर घायाळ झाला आहे टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या.