Breaking News

पनवेलमध्ये पोलिओ लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद

51,664 बालकांचे लसीकरण

पनवेल ः प्रतिनिधी

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पनवेल महापालिका क्षेत्रात 0 ते 5 वयोगटातील सुमारे 51,664 बालकांना लस देण्यात आली. आयुक्त डॉ. सुधाकर देशमुख यांच्या हस्ते लसीकरणास मोठा खांदा येथील मराठी शाळेत सुरुवात झाली. या वेळी एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, अशा सूचना आयुक्तांनी  केल्या.

 कोरोनासारख्या महामारीविरोधात लढताना नियमित लसीकरणाकडेही पालिकेने विशेष लक्ष दिले आहे. आयुक्त डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या संकटकाळात पालिकेने आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम केले. पल्स पोलिओ मोहिमेत सर्व बालकांना लस मिळाली पाहिजे याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. मोठा खांदा येथे आयोजित पोलिओ लसीकरणावेळी त्यांनी लसीपासून एकही बालक वंचित राहू नये याची काळजी घेण्याची सूचना केली, तसेच नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले.                                                                                                              

या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, डॉ. चिंचोळीकर, आरोग्य अधिकारी  डॉ. रेहाना मुजावर, पनवेल महापालिका तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, सायंकाळी कामोठे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली.  

यात कोरोना व पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत इंद्रधनुष्य मिशनवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीस उपसंचालक आरोग्यसेवा ठाणे डॉ. गौरी राठोड, सहाय्यक संचालक कुष्ठरोग  आरोग्यसेवा ठाणे डॉ. गीता खरात, वैद्यकीय मुख्याधिकारी पनवेल महानगरपालिका डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी पनवेल महापालिका डॉ. रेहाना मुजावर, वैद्यकीय अधिकारी कामोठे आरोग्य केंद्र डॉ. पद्मिनी येलवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक  डॉ. लोहारे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply