माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील जांभुळवाडी गावाच्या हद्दीत पुलाजवळ अंदाजे 50 ते 55 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून माणगाव पोलीस तिच्या नातेवाईकांचा शोध
घेत आहेत. या घटनेतील महिलेच्या डोक्याला जुनी जखम झालेली असून त्यावर उपचार न केल्याने ही महिला मृत स्थितीत आढळून आली. तिचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे, अंगाने सडपाळ, उंची अंदाजे 5 फूट, रंग गहुवर्णी, केस पिकलेले असून, डोक्यात जुनी जखम झालेली, अंगावर हिरव्या रंगाची साडी आहे. या वर्णनाची महिला कोणाच्या ओळखीची असल्यास अथवा तिच्या नातेवाईकांनी माणगाव पोलीस ठाणे (दूरध्वनी क्र. 02140-263005) येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक काळे करीत आहेत.