Monday , June 5 2023
Breaking News

अनंत गीते लाखांच्या मताधिक्याने विजयी होतील

आमदार प्रविण दरेकर यांचा विश्वास, परळीत महायुतीची प्रचार सभा

महाड : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार अनंत गीते हे लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी परळी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्त केला.

सुधागड तालुक्यातील परळी येथे भर दुपारी रणरणत्या उन्हात झालेल्या प्रचारसभेत आमदार दरेकर बोलत होते. देशाला प्रगतीपथाकडे नेणार्‍या व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावणार्‍या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी रायगडचा मावळा खासदार म्हणून दिल्लीत पाठवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

गेल्या 40 वर्षात जो विकास होऊ शकला नाही, तो सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून आता झाल्याचे आमदार प्रविण दरेकर यांनी विविध विकासकामे व योजनांची माहिती देऊन स्पष्ट केले.

या वेळी माजीमंत्री रवीशेठ पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तर विष्णू पाटील यांनी ही लढाई सदाचार व भ्रष्टाचाराची असल्याचे सांगितले.

तटकरे यांचे कुटुंबापलीकडे लक्ष्यच गेले नसल्याचा आरोप  शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी केला. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र देशमुख, सुधागड पंचायत समिती उप सभापती उज्ज्वला देसाई, तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, जिल्हा चिटणीस राजेश मापरा, प्रणय सावंत, आरपीआयचे समीर इंगळे, प्रदीप नाईक, सरपंच कानडे, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदार या प्रचार सभेला उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply