Breaking News

रोहितची दुखापत गंभीर नाही

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्याआधी भारतीय संघासाठी चांगली बातमी आली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार आहे. रविवारी 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हा सामना होणार आहे. शुक्रवारी सरावादरम्यान रोहितला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने लगेचच सरावसत्र सोडलं होतं.

यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने रोहितवर उपचार केले. यानंतर केलेल्या तपासण्यांमध्ये रोहितची दुखापत फारशी गंभीर आढळली नाही. यानंतर बीसीसीआयने एक पत्रक काढत रोहित पहिल्या सामन्यासाठी फिट असल्याचे जाहीर केले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे बांगलादेशविरुद्ध टी-20 सामन्याचे नेतृत्व देण्यात आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply