Breaking News

पीक नुकसानीचे पंचनामे करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची सूचना

अलिबाग ः जिमाका

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासकीय यंत्रणांनी शेतकर्‍यांपर्यंत पोहचून नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकर्‍यांना दिलासा कसा देता येईल असे प्रयत्न करावेत. जिल्हा स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, तसेच पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश राज्यमंत्री, बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 2) येथे दिले. अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, उपविभागीय अधिकारी अलिबाग शारदा पोवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, तहसीलदार सचिन शेजाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री आ. चव्हाण म्हणाले की, या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसाची तीव्रता ऑक्टोबरमध्ये अधिक होती. त्यामुळे प्रशासनाने ही संपूर्ण स्थिती अत्यंत संवेदनशीलतेने आणि

सर्वोच्च प्राधान्य देत हाताळावी. प्रत्येक शेतकर्‍याची समस्या ऐकून घ्यावी. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मोबदला देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी संबंधित यंत्रणेला दिल्या. पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीही केली.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply