Wednesday , February 8 2023
Breaking News

दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू

दुभाजकावर दुचाकी धडकून चालकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर उरणमधील भेंडखळ येथून खोपटा येथील बामनलॉरी येथे जाणार्‍या भरधाव मोटारसायकलवरील चालकाचा ताबा सुटल्याने सदर मोटारसायकल रस्ता दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात मोटारसायकलचालकाचा मृत्यू, तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव महंमद अस्लम बग्गा (30), तर जखमी झालेल्या त्याच्या सहकार्‍याचे नाव मुर्तझा मनिर हुसेन खान (19) असे आहे. हे दोघेही उरणच्या खोपटा भागातील बामनलॉरी येथील जयकुमार कन्स्ट्रक्शनवर सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. महंमद आणि मुुर्तझा हे दोघेही भेंडखळ येथील बाजारात गेले होते. तेथून दोघांनी केळी खरेदी केल्यानंतर ते मोटारसायकलने आपल्या साईटवर परतत होते. हे दोघेही जीडीएल पेट्रोल पंपाकडून खोपटा गावाकडे जाणार्‍या रोडवरील बामनलॉरीजवळील टी-पॉइंटजवळील रोडवर आले असता महंमद अस्लम बग्गा खान याने आपल्या साईटवर जाण्यासाठी अचानक वळण घेतले. त्यामुळे महंमदचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने सदरची मोटारसायकल तेथील रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात महंमदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो काही वेळात मरण पावला. या अपघातात त्याचा साथीदार मुर्तझा हुसेन हादेखील जखमी झाला आहे. त्याला उरणमधील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताला मृत मोटसारसायकलचालक महंमद बग्गा हाच जबाबदार असल्याचे आढळून आल्याने उरण पोलिसांनी त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply