Breaking News

मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास बुधवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
बृहन्मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे, परंतु राज्यात कोविडची आपत्ती तसेच बृहन्मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महापालिका अधिनियम 1988मध्ये कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणार्‍या महापालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहील.
दरम्यान, राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारून माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे बळकटीकरण करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळ बैठक झाला.
माहिती जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाते. या महासंचालनालयाच्या अंतर्गत आठ विभागीय माहिती कार्यालये आहेत, परंतु बहुतांश माहिती कार्यालये भाड्याच्या जागेत असून अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply