आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त
कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रामपंचायत हद्दी असलेल्या बांधणवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) करण्यात आले. या वेळी आमदार बालदी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश बांधणवाडी ग्रामस्थांना देताना पुढील कार्तिकी एकादशीपूर्वी मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील, तारा गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते हिराजी पाटील, पांडुरंग पाटील, व्ही. डी. पाटील, जीवन टाकळे, कर्नाळा ग्रामपंचायत सदस्य जगदीश जंगम, शिरढोण ग्रामपंचायतीचे सदस्य प्रमोद भोपी, माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, हरीबुवा काईनकर, गणेश पाटील, कमलाकर टाकळे, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, केळवणे जि. प. युवा मोर्चा अध्यक्ष रोशन पाटील, तारा बुथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, दीपक पाटील, दिनेश मोरे, विनायक मोरे, अशोक पाटील, राम पाटील वारकरी, भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी दिनेश पाटील, जगदीश जंगम, भरत (छोटू) जुमलेदार, चंद्रकांत पाटील, गणेश पाटील व इतरांनी बांधकामास विटा, वाळू, खडी, सिमेंट असे साहित्य देण्याचे जाहीर केले.