Breaking News

उरण शहरात भाज्यांचे भाव भिडले गगनाला

उरण : वार्ताहर

पाऊस लांबल्यामुळे इतर पिकांसोबत भाजी पिकांचे मळेही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरता कोसळला आहे, तर उरणमधील शहरी व ग्रामीण भागातील भाजीचे भाव चांगलेच कडाडले असून येत्या काही दिवसांत भाजीचीच कमतरता भासणार असून, भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आवकाळी परतीच्या पावसाचा फटका सर्व प्रकारच्या शेती उत्पादनाला बसला आहे. या पावसामुळे राज्यातील भात, गहू, ज्वारी, सोयाबीनसारखी पिके तर नष्ट झाली आहेतच, परंतु कोथिंबीर, फ्लावर, गवार, कोबी, मटार, भेंडी, काकडी इत्यादी भाजी पिकांचेचे मळे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे रोजच्या जीवनात आहारात वापरल्या जाणार्‍या भाज्यांचे भाव उरणच्या बाजारपेठेत ही कडाडले आहेत, तसेच येत्या काही दिवसांत भाज्यांचे भाव आसमान गाठणार आहेत, असे भाजीविक्रेते भूषण म्हात्रे यांनी सांगितले. 

भाजीची दुकाने उरण शहराबरोबरच गावोगावी झाली आहेत. हे सर्व दुकानदार एपीएमसी मार्केट वाशी येथूनच भाजी होलसेल दारात खरेदी करून शहरात व गावोगावी रिटेल दरात विक्री करतात. त्या विक्रेत्यांमध्ये परप्रांतीय विक्रेत्यांबरोबरच स्थानिक विक्रेतेही भरपूर प्रमाणात आहेत. आजच्या घडीला या सर्व विक्रेत्यांकडे थोड्याफार फरकाने सारखेच भाज्यांचे दर ग्रामीण व शहरी भागात पाहावयास मिळतात, परंतु पावसाने केलेल्या भाजी मळ्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी तर उद्ध्वस्त झालाच, परंतु सामान्य नागरिकही भाज्यांच्या कडाडलेल्या भावामुळे चिंताक्रांत झाला आहे, असे भरत गजानन पाटील यांनी सांगितले.

भाज्यांचे सरासरी भाव

कोथिंबिर- 60   ते 80 रु जुडी

आळू – 100 ते 120 रु किलो

भेंडी-50  ते 60 रु. किलो

मटार-  100  ते 120 रु. किलो

वांगी- 40  ते50 रु. किलो

मिरची 60  ते 80 रु. किलो

फरसबी 50 ते 60 रु किलो

गवार -80 ते80  रु. किलो

सिमला -40 ते50  रु. किलो

कोबी – 40 ते 65 रु किलो

टोमटो – 40 ते 45 रु. किलो

फ्लॉवर -70 ते 80 रु. किलो

काकडी- 40 ते50 रु किलो

गाजर -70 ते 80  रु किलो

लिंबू- 10 रुपयाला 3

लसूण-200 ते210 रु किलो

कांदे- 60 ते 65 रु किलो

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply