पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या ‘बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019’ स्पर्धेत मिस गटामध्ये प्रथम क्रमांक वृषाली थोरात, द्वितीय क्रमांक मधू जाजू आणि तृतीय क्रमांक निक्की रंग्रस यांनी; तर मिसेस गटामध्ये प्रथम क्रमांक भाविका वचनी, द्वितीय क्रमांक संपूर्णा सरकार आणि तृतीय क्रमांक संचिता शेलार यांनी पटकावला. सर्व विजेत्या स्पर्धकांचे उपस्थित मान्यवरांनी सत्कार केले.
रोटरॅक्ट क्लब पनवेल, अध्यक्ष चिराग गडगे, अथर्व मीडिया आणि टीआपीएल यांच्या माध्यमातून ‘बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019’ या स्पर्धेचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होती. ही स्पर्धा पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व वीर वूमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर, सन्माननीय अतिथी मिस इंडिया नंदिनी गुप्ता, आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी अँकर व मिस इंडिया सिमरन आहुजा, फॅशन डिझायनर जुवेरीय नुसरत, डीआयडी सुपर मॉम विनर दलप्रीत कौर, श्रीराज गडगे, मिलिंद राणे आदी उपस्थित होते.