Breaking News

केंद्राच्या घोषणेनंतर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 8.7 आणि 9.52 रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून ती गुरुवार (दि. 4)पासून लागू करण्यात आली आहे.

ज्या राज्यांनी अतिरिक्त मूल्यवर्धित कर लाभ दिला आहे त्यात कर्नाटक, पुडुचेरी, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, आसाम, सिक्कीम, बिहार, मध्य प्रदेश, गोवा, गुजरात, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि लडाख यांचा समावेश आहे.

कर्नाटकात मूल्यवर्धित कर कपातीमुळे पेट्रोलच्या दरात 8.62 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.40 रुपयांची कपात झाली, तर मध्य प्रदेशने आपल्या नागरिकांना पेट्रोलवर 6.89 रुपये आणि डिझेलवर 6.96 रुपये अतिरिक्त सूट दिली. उत्तर प्रदेशने पेट्रोलवरील व्हॅट 6.96 रुपये आणि डिझेलवर 2.4 रुपये प्रति लिटरने कमी केला. मेघालयानेही पेट्रोलवरील व्हॅट 20 टक्क्यांवरून 13.5 टक्के प्रति लिटर आणि डिझेलवर 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, असे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ज्या राज्यांनी आतापर्यंत मूल्यवर्धित कर कमी केला नाही त्यात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड आणि तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply