कर्जत : बातमीदार
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या बालदिनानिमित्त गुरुवारी
(दि. 14) माथेरानमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरपालिकेचे शिक्षण सभापती संदीप कदम व माजी शिक्षक सुनील कदम हे उपस्थित होते.
माथेरान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळा आणि प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. दरम्यान, या बालदिनाचे महत्व नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व शिक्षण सभापती संदीप कदम यांनी विषद केले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. दोन्ही शाळांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.