Breaking News

कर्नाळा ग्रामपंचायतीमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त

आगामी कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला झटका बसला आहे. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

या कार्यक्रमास साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, चंद्रकांत पाटील, अश्फाक दाखवे, गणेश पाटील, नरेश रजपूत, प्रवीण कोळी, हरेश कोळी, जितेंद्र कोळी, रणजित पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी कर्नाळा ग्रामपंचायतीमधील बानुबाईची वाडी (बारापाडा) येथील शेकापचे चंद्रकांत कृष्णा वाघमारे, पोशा सोमा पवार, श्रावण मंगळ्या वाघमारे, अशोक कृष्णा वाघमारे, दामोदर महादेव हाप्से, राम बाळू वाघे, शांताराम गोपीनाथ वाघमारे, सामू बाब्या वाघमारे, रामदास शंकर वाघमारे, तुलसीराम गौर्‍या वाघमारे, हिरामण काण्या वाघमारे, रामदास हरी नाईक, सखाराम जाण्या वाघमारे, बाळाराम विठ्ठल सवार, दिलीप शांताराम वाघमारे, रोहित गोविंद वाघमारे, सुरेश बारक्या हाप्से, गणपत कृष्णा वाघमारे, जनार्दन रामदास वाघमारे, नारायण राम वाघमारे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपचा झेंडा हाती घेतला.

कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शेकापला जोरदार धक्का दिला आहे. वातावरण आपल्या बाजूने असून, कर्नाळा ग्रामपंचायत जिंकायचीच आहे, त्यासाठी कामाला लागा.
-अरुणशेठ भगत, अध्यक्ष, पनवेल तालुका भाजप

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply