Breaking News

नुकसानभरपाई घेण्यात पोलादपुरातील शेतकर्यांचा निरुत्साह

बँक खाते क्रमांक देण्याचे तहसीलदार दीप्ती देसाई यांचे आवाहन

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यात गेल्या दोन- तीन वर्षातील धान पीक नुकसानभरपाईची रक्कम तहसील कार्यालयाद्वारे थेट बाधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांनी तातडीने त्यांचे बँक खाते क्रमांक आणि सामायिक शेती असल्यास सहमतीपत्र स्थानिक तलाठी अथवा तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याचे आवाहन पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई यांनी केले आहे. यंदा पोलादपूर तालुक्यात झालेल्या भातपीक नुकसानीसंदर्भातील पंचनामे तालुका कृषी कार्यालयामार्फत सुरू असून, याकामीही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक तसेच तलाठी यांना सहकार्य करण्याची गरज आहे, असे तहसीलदार देसाई यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची रक्कम बाधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यास विलंब

पोलादपूर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी सामायिक शेती करत असून काही खातेदार व त्यांचे सहयोगी नातेवाईक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद, ठाणे, पिंपरी-चिंचवड व अन्य शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. भातशेती नुकसानभरपाईची रक्कम मिळविण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जमा करण्यास ते गावाकडे येत नाहीत. परिणामी 2017-18 सालातील सुमारे 50 टक्के नुकसानभरपाईची रक्कम बाधित शेतकर्‍यांच्या बँक  खात्यात जमा करण्यात विलंब झालेला दिसून येत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply