Breaking News

भटक्या कुत्र्यांच्या त्रास वाढला; कर्जतमधील नागरिक वैतागले

कर्जत : बातमीदार

शहरात मागील काही दिवसांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाने  कर्जतमधील नागरिकांच्या त्रासात भर पडली पासून नगरपालिका प्रशासन मात्र याबाबत ढिम्म असल्याचे चित्र आहे. कर्जत शहराच्या हद्दीमध्ये अन्य शहरातील कुत्रे आणून सोडले जातात, अशी ओरड नेहमी होत असते. मग ते भटके कुत्रे मोकाटपणे अन्नाच्या शोधात शहरी भागात प्रवेश करतात आणि खायला मिळाले नाही तर ते कुत्रे लोकांना चावे घेण्याच्या घटना घडत आहेत. या कुत्र्यांच्या आपापसात होणार्‍या भांडणामुळे व भररस्त्यात ती कुत्रे फिरत असल्यामुळे ते वाहनांच्यामध्ये येउन दुचाकी चालकांचे अपघात शहरात सर्रास घडत आहेत. निर्बिजीकरण करून या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नगरपालिका नियंत्रण मिळवणार असल्याचे मागे सांगण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत त्या उपक्रमाला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे कर्जत नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आम्ही भटक्या व मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी निविदा काढल्या होत्या, मात्र त्या कुणीच भरल्या नाहीत. त्यामुळे फेरनिविदा कुढल्या आहेत. तसेच तात्पुरत्या स्वरूपात एका प्राणिसंस्थेकडून भटक्या व मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, कर्जत

कर्जत नगर परिषद हद्दीत भटक्या व मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढीस लागला आहे. त्याबाबत अनेकदा नगर परिषदेकडे तक्रार करूनही प्रशासन मात्र कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.

-कृष्णा जाधव, स्थानिक नागरिक, कर्जत

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply