लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; मनपा प्रभाग ड कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल : प्रतिनिधी
महापालिकेचा कारभार करताना सर्वांनी एकत्र येऊन आपल्या प्रभागाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) येथे केले. ते प्रभाग ‘ड’ कार्यालय उद्घाटन समारंभात बोलत होते.
पनवेलच्या शिवाजी चौकात असलेल्या महापालिका कॉम्प्लेक्समध्ये प्रभाग ’ड’च्या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी सकाळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयात कामासाठी येणार्या सामान्य माणसाचे समाधान झाले पाहिजे. नगरसेवकांनी येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी या वेळी सूचित केले.
या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ’ड’चे अध्यक्ष राजू सोनी, नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, समीर ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, वृषाली वाघमारे, सुशीला घरत, उपायुक्त जमीर लेंगरेकर आदी उपस्थित होते.