Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी आकाराला येत असतानाच नेत्यांच्या चर्चा, बैठका आणि खलबतांमुळे विलंब होत आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी (दि. 19) होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आल्याने ही सत्ताकोंडी नेमकी फुटणार कधी, असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी बैठक होणार होती. ती पुढे ढकलण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत. त्यामुळे ही बैठक उद्या होणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत दिल्लीत सोमवारी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीतही तोडगा निघू शकला नाही.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीत सरकार स्थापन करण्याबाबत किंवा शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ राजकीय परिस्थितीबाबत बोलणे झाले, असे पवारांनी सांगितले होते. त्यांच्या या विधानामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा विचार करणार्‍या शिवसेनेच्या अडचणींमध्ये यामुळे अधिकच भर पडली आहे.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply