Breaking News

कोलेटी, पाबळ व बर्दावाडीत गणित मेळावे

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महानगर गॅस लिमिटेडचा उपक्रम

पाली : प्रतिनिधी

मुलांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन व महानगर गॅस लिमिटेड यांच्या वतीने येथील कोलेटी, पाबळ व बर्दावाडी या गावात स्वयंसेवकांच्या माध्यमातून गणित मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थांनी आपल्या पाठ्यपुस्तकाशी निगडित मॉडेल बनविले. यामध्ये लहान मुलेही सहभागी झाली होती. या मेळाव्यात मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शन लावले होते. संख्यासंबंधित, बेसिक क्रियासंबंधित साहित्य बनविले होते. वस्ती, घर, मंदिर, शाळा इत्यादी गोष्टींचा आधार घेत गावकर्‍यांना मॉडेल बनवून दाखवले व त्यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. समन्वयक भाग्यश्री विजय भोईर यांनी स्वयंसेवकांच्या सहकार्याने योग्य ते नियोजन करून संपूर्ण उपक्रम यशस्वीरीत्या राबविला. या उपक्रमात आदिवासीवाडीतील मुलांचा सहभाग व उत्साह वाखाणण्याजोगा होता. हे मेळावे यशस्वी करण्यासाठी  केंद्र समन्वयक भाग्यश्री भोईर, कार्यक्रम प्रमुख मच्छिंद्र पडवळ व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेतली. सदर मेळावा पाहण्यासाठी गावातील माता, पालक, ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply