Breaking News

‘पीबीएल’मधून श्रीकांतचीही माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे श्रीकांतने सांगितले.

26 वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात बंगळुरू रॅप्टर्सचे प्रतिनिधित्व करताना संघाला पहिलेवहिले पीबीएल जेतेपद मिळवून दिले होते, परंतु 20 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार्‍या पाचव्या पीबीएल हंगामात तो सहभागी होणार नाही. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालनेही यंदा लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

2017मध्ये चार विजेतेपदे जिंकणारा श्रीकांत त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये झगडतानाच आढळत आहे. वर्षाच्या पूर्वार्धात त्याने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र लय व तंदुरुस्तीमुळे श्रीकांतचे जागतिक क्रमवारीतील स्थान 11पर्यंत खालावले आहे. महिन्याच्या पूर्वार्धात हाँगकाँग खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत त्याने मजल मारली होती.

आगामी स्पर्धात्मक कार्यक्रम खडतर आहे. हे आव्हान आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी हा निर्णय मी घेत आहे. येत्या हंगामात कामगिरी अधिक उंचावण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

-किदम्बी श्रीकांत

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply