‘राजा शिवछत्रपती परिवार‘चा उपक्रम
कर्जत : बातमीदार
‘राजा शिवछत्रपती परिवार‘ या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आणि परिसरात मंगळवारी (दि. 26) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात संस्थेच्या 50हुन अधिक सदस्यांनी हातात फावडे, टिकाव, आणि लोखंडी पंजे घेऊन सहभाग घेतला होता. ग्रामस्थदेखील या मोहीमेत सहभागी झाले होते. तर कशेळे ग्रामपंचायतीने कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाडी दिली होती. या मोहीमेत संस्थेच्या स्वयंसेवकांनी ग्रामीण रुग्णालय परिसरातून 20 बॅग कचरा गोळा केला. तो सर्व कचरा घंटागाडीमध्ये भरून डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले. कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षे काम करणार्या उमंग संस्थेने या वेळी रुग्णालय परिसरात बाग फुलविण्याचे आश्वासन दिले.