कर्जत : बातमीदार
शहर आणि परिसरात वैद्यक क्षेत्रात काम करणार्या सुमारे 200 डॉक्टरांची कर्जत मेडिकल असोसिएशन ही संस्था 25 वर्षाची झाली आहे. रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्ताने संस्थेच्या वतीने नुकताच वावंढळ येथील रिसॉर्टमध्ये जीपकॉन 2019 या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुंबईमधील प्रसिद्ध डॉ. विजय पानीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश साळुंखे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या मागील 25 वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. डॉ. विजय पानीकर यांनी, सामाजिक बांधिलकी घेऊन काम करीत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.
सोहळ्याच्या दुसर्या सत्रात डॉ. रेड्डी लॅबोरेटरीचे डॉ. तज्जेनदर सिंग यांनी ओषधे निर्माणमधील योगदानाबद्दल माहिती दिली. नवी मुंबईमधील अपोलो हॉस्पिटलचे डॉ. संजीव कालेलकर, डॉ. अनन्या पाथरीकर, ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. गौरव चौबल, पी. के. उबल, डॉ. स्वप्नील कपोते आणि डॉ. हरेश शेट्टी यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ. साजिद, डॉ. मनाली बोडके यांनी केले. जीपकॉन 2019 सोहळा यशस्वी करण्यासाठी कर्जत मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. म्हात्रे, डॉ. पडते, डॉ. चित्ते, डॉ. आदित्य जंगम, डॉ. माने, डॉ. सुप्रिया यांनी पुढाकार घेतला होता.