Breaking News

टोलनाक्यावर उद्यापासून ‘फास्टॅग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

टोलच्या नियमांमध्ये 1 डिसेंबरपासून मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये ‘फास्टॅग’द्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारने 1 डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणे अनिवार्य केले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घोषणा केली होती.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरातील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वाहनचालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावे लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅॅग विकत घेता येणार आहे. टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंडस्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे. यामध्ये रेडियो फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफडीआय) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

-अशी आहे वर्गवारी

कार, जीप, व्हॅन आणि यांसारख्या वाहनांना ‘फोर’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवले जाणार आहेत, तर हलक्या मालवाहू आणि व्यावसायिक वाहनांना ‘फाइव्ह’ क्लासचे, थ्री अ‍ॅक्सेल व्यावसायिक वाहनांना ‘सिक्स’ क्लासचे आणि बस आणि ट्रकना ‘सेव्हन’ क्लासचे ‘फास्टॅग’ बसवण्यात येणार आहेत.

-अशी आहे प्रक्रिया

‘फास्टॅग’ अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला एक एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची व्हॅलिडिटी पाच वर्षांची असेल. ती पूर्ण झाल्यावर नव्याने ‘फास्टॅग’ खरेदी करावे लागणार आहे.

-आवश्यक कागदपत्र

वाहनाचे नोंदणीचे पत्र

वाहनाच्या मालकाचा फोटो

केवायसीसाठी डॉक्युमेंट्सवास्तव्याचा दाखला

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply