Breaking News

सख्ख्या भावाने केला बलात्कार

नागपूर ः प्रतिनिधी : जीवे मारण्याची धमकी देऊन सख्ख्या भावानेच बहिणीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार नागपूरमध्ये समोर आला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक व रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेतले आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित मुलगी आणि तिचा भाऊ राहतो. दोघेही अल्पवयीन आहेत. चार महिन्यांपूर्वी दोघे घरी एकटे होते. नराधम भावाने जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो सतत तिच्यावर अत्याचार करत होता. काही दिवसांपूर्वी मुलीची प्रकृती खालावली. नातेवाइकांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले. हे ऐकून नातेवाइकांना धक्काच बसला. त्यांनी मुलीची चौकशी केली असता सख्खा भाऊच अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले. अखेरीस आईने मुलीसह हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीही अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply