Monday , January 30 2023
Breaking News

रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेचे आंदोलन

ईपीएफ पेन्शन वाढीचा प्रस्ताव मांडण्याचे सचिवांचे आश्वासन

मोहोपाडा ः वार्ताहर

पेन्शन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेच्या अखिल भारतीय ईपीएफ पेन्शनर संघटना राष्ट्रीय समन्वयक समितीच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर देशव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी पेन्शन वाढीचा प्रस्ताव अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पुढे ठेवण्याचे आश्वासन कामगार मंत्र्यांच्या सचिवांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेसह देशातील पेन्शनर संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्रातील पेन्शर्स यांनी धरणे आंदोलन करुन संघटनेच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री यांच्या सचिवांची भेट घेतली. यावेळी सचिवांनी हिरवा कंदील दाखवत पेन्शनवाढीबद्दल आम्ही सकारात्मक आहोत. पेन्शन विक्रीची रक्कम पुनस्थापित करण्याचा निर्णय झाला असून त्याचे परीपत्रक लवकरच काढणार असल्याचे स्पष्ट केले.

याप्रसंगी दिल्ली येथे झालेल्या लक्षवेधी धरणे आंदोलनाला देशातील पेन्शनर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व रायगड औद्योगिक पेन्शनर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बामणे, शिवाजी भोसले, एम. धर्मजन, कॉ. व्हि. एम. पतंगराव, एम.आर.जाधव, आत्माराम मोठले, कॉ. अतुल दिघे, कॉ. आनंदराव वायकर, देवराव पाटील, वसंतराव तोरडमल, बलभिम कुबडे, टि. के. कांबले, अनंत कुलकर्णी, डि. बी. जोशी यांनी केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply