पनवेल : महापालिकेच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांनी वृषाली वाघमारे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय.टी. देशमुख, महिला मोर्च्याच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, नगरसेविका सुशिला घरत, मुग्धा लोंढे, प्रभाग क्रमांक 17 अध्यक्ष विजय म्हात्रे, विनोद वाघमारे, प्रेम डुकरे, राजेंद्र ठोकल, संजय जाधव, अशोक आंबेकर, लक्ष्मी चव्हाण, शारदा माने, जितेंद्र वाघमारे, अनिता रणदिवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
