म्हसळा : प्रतिनिधी
कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. महागड्या दरातील कांदे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची नामी शक्कल रहिमतपूर (सातारा) येथील टेम्पोवाला बंड्याने आखली आणि त्याचा फायदा म्हसळ्यातील गोरगरीब लोकांना होत आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव प्रचंड वाढल्याने म्हसळा शहरातही कांद्याचे भाव 100 ते 120 रुपयांपर्यंत गेले. याच वेळी सातार्यातील रहिमतपूर येथील बंड्या नामक टेम्पोवाल्याने म्हसळा एसटी स्टँडवर 60 ते 80 रुपये प्रतिकिलोने कांदा विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने दिवसाआड बंड्या 20 ते 25 गोण्या कांद्याची विक्री करीत आहे.