Monday , February 6 2023

‘आयपीएलचे सामने रात्री आठलाच सुरू होणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या बाराव्या हंगामातील सामन्यांच्या वेळांबद्दलचा संभ्रम अखेरीस संपुष्टात आलेला आहे. 23 मार्चपासून रंगणारे आयपीएलचे सर्व सामने रात्री 8 वाजता सुरु होणार असल्याचे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिले. संध्याकाळचे सामने 4 वाजता; तर रात्रीचे सामने 8 वाजता सुरू होतील. मधल्या काही दिवसांमध्ये बीसीसीआय सामन्यांची वेळ 7 वाजता करणार असल्याची चर्चा होती. अकराव्या हंगामाच्या उत्तरार्धातही बीसीसीआयने काही सामन्यांची वेळ संध्याकाळी 7 वाजता ठेवली होती, मात्र काही संघमालकांचा या निर्णयाला विरोध होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी सामन्यांची वेळ रात्री 8 वाजताचीच ठेवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply