कर्जत : नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर निवडून आल्याबद्दल शंकर घोडविंदे यांचा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपसरपंच शंकर घोडविंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष प्रवीण पाटील, केशव मुने, ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद पाटील, नागो गवळी, शिवराम बदे, शिवराम महाराज तुपे, अरुण कराळे, भूषण पेमारे, सोनावळे गुरुजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper