पेण : प्रतिनिधी
पेण फणसडोंगरी येथील एका बँकेच्या खातेदाराची अज्ञात इसमाने फसवणूक करून त्याच्या खात्यातून 14 हजार रुपये लंपास केले. सोमवारी (दि. 9) सकाळी 10.30 च्या सुमारास अज्ञात इसमाने मोबाईल नंबरवरुन कॉल करुन बँक खातेदाराच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्याच्या बँकेचा एटीएम कार्ड पिनकोड नंबर व ओटीपी नंबर मागून घेतला. व त्याच्या बँकेच्या खात्यातून 14 हजार रुपये काढुन त्याची फसवणूक केली. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.