Breaking News

सीकेटी विद्यालय संकुलात वार्षिक क्रीडा महोत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) शैक्षणिक संकुलात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला असून, त्याचे उद्घाटन  संस्थेच्या विश्वस्त अर्चना ठाकूर यांच्या हस्ते झाला.

प्रमुख पाहुण्या अर्चना ठाकूर यांनी उद्घाटन समारंभावेळी सादर केलेल्या तालबद्ध कवायतीबद्दल विद्यार्थ्यांची प्रशंसा केली, तसेच या महोत्सवात होणार्‍या क्रीडा सामान्यांकरिता शुभेच्छा दिल्या. 

प्रास्तविकात मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्देश स्पष्ट करून क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर यशस्वी कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

या वेळी सीकेटी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी  आकर्षक कवायतींमधून चांदणी, कमळ अशा विविध रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कवायतींसाठी अशोक पाटील़, नितीन म्हात्रे व प्रकाश रिसबुड या क्रीडा शिक्षकांनी अतिशय मेहनतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली होती.

उद्घाटन समारंभास सीकेटी संकुलातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. चारही कुलातील प्रमुख आणि खेळाडूंनी मार्चपास संचलनाचे शिस्तबद्ध व दिमाखदार प्रात्यक्षिक सादर केले. अतिशय कलात्मक व फिट इडिया या संकल्पनेवर आधारित रांगोळ्या हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

मराठी व इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि ज्युनियर कॉलेज या सर्व विभागांतील विद्यार्थी वाषिक महोत्सवातील विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होतात. यात वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचा समावेश असतो. सांघिक स्पर्धांमध्ये कबड्डी, डॉचबॉल, लंगडी,  क्रिकेट, तर वैयक्तिक स्पर्धांमध्ये बुद्धीबळ, शॉटपुट, रेस्टलिंग, लाँगजंप, लाँग व हाय जंप, तसेच लाँग हाय जंप ट्रिपल असे सर्व प्रकार गटनिहाय आयोजिले जातात. यंदाही ही क्रीडा महोत्सव रंगणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply