Breaking News

मोकाट गुरे अन् कुत्र्यांचा उच्छाद

म्हसळा नगरपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचे ताशेरे

म्हसळा : प्रतिनिधी

येथील नगरपंचायत हद्दीतील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना हैराण केले असून, मागील 15 ते 20 दिवसात शहरात कुत्रा चावण्याच्या 10 ते 15 घटना घडल्या. त्यांच्यावर ग्रामिण रुग्णालयात व माणगाव येथे उपचार करण्यात आले. म्हसळ्यातील रस्त्यावर खेळणार्‍या मुलांवर भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. मोकाट गुरांनीही रस्त्यांवरील पादचारी, ज्येष्ठ नागरिक, फुटपाथवरील व्यावसायीक, भाजी व फळ विक्रेते, वाहतुकदारांना हैराण केले आहे. तसेच सकाळी काकड आरती, बालोपासना, रात्री भजनासाठी जाणार्‍या भाविकांसह पहाटे व रात्री नमाजीसाठी मशिदीत जाणार्‍या मुस्लीम बांधवांमध्येही भटक्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली आहे. मोकाट गुरांमुळे अनेक वेळा म्हसळा शहरांत वाहतूक कोंडी होते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना गुरे हाकावी लागतात. गुरे नियंत्रण हा विषय प्राधान्याने नगरपंचायतीचा आहे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा म्हसळा नगरपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

मोकाट गुरे व भटकी कुत्री, हा म्हसळ्यातील गंभीर प्रश्न आहे, तो मासिक सभेपुढे घेण्यात येणार आहे.

-दिपाली मुंडये,  प्रशासकीय अधिकारी,  म्हसळा नगरपंचायत

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply