
पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर शहरातील भाजप नगरसेवक रामजीभाई बेरा यांच्या नगरसेवक निधीतून येथील मैदानात जेष्ठ नागरिक तसेच नागरिकांना विसाव्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. सिडको नोड मधील विकासकामांमध्ये विविध परवानग्यांचा अडथळा निर्माण होत होता. मात्र सिडको नोडमध्ये पालिकेच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्याने खारघर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामांना सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात येथील रहिवाशांना बसण्यासाठी मैदानात शेड उभारले जाणार आहे.