
कामोठे ः येथे अॅड. आशा भगत यांचे नूतन कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बुधवारी भेट दिली. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अॅड. भगत यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, दिलीप पाटील, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, भाजप नेते भाऊ भगत, प्रदीप भगत, राजेश म्हात्रे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्यिकांची मांदियाळी हे पुस्तक प्रकाशित

पनवेल ः खालापूर-लोधीवली येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचे इतिहासाचे शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ बालभारतीचे अभ्यास गट सदस्य संजय वझेकर यांचे नुकतेच साहित्यिकांची मांदियाळी हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यानिमित्त बुधवारी वझेकर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेत त्यांना साहित्यिकांची मांदियाळी हे पुस्तक भेट दिले.
जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन

पनवेल ः जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने पनवेल ते शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. या सोहळ्यास भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, ज्येष्ठ नेते सी. सी. भागत, जितेंद्र वाघमारे, मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे व मंडळाचे सदस्य यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.