उरण : वार्ताहर – उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्त्वावर विश्वासू ठेऊन भाजपमध्ये शुक्रवारी (दि. 25) प्रवेश केला. 15 जानेवारी 2021 रोजी होऊ घातलेल्या नागाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या वेळेस शेकापच्या पदाधिकार्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नागाव ग्रामपंचायत हद्दीत भाजपची ताकद वाढली आहे.
नागाव ग्रामपंचायत शेकापचे माजी सरपंच हरेश हनुमंत कातकरी यांच्यासह विजय नाईक, दिपक वाघ, राहुल वाघ, प्रमोद कातकरी, दिनेश कातकरी, रोहित वाघे, राकेश कातकरी, सुधाकर नाईक, विलास वाघे, नितीन वाघ आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आमदार महेश बालदी यांनी भाजपमध्ये स्वागत केले.
या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, जसिम गॅस, भूपेन घरत, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र, हितेश शाह, सुरज ठवळे, समीर कुथे, मुकेश घरत आदी उपस्थित होते.