Breaking News

द्रोणागिरी हायस्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण

आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती

उरण ः वार्ताहर

विद्यालयाचा वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मंगळवारी (दि. 10) झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार महेश बालदी यांची उपस्थिती लाभली. तसेच उरण नगरपरिषद नगरसेवक कौशिक शहा, आयओसीएलचे प्रबंधक आर्चित चक्रवर्ती, आयओसीएलचे सेल्स मॅनेजर जी. के. राव, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी, व्हाइस चेअरमन नरेश कोळी, माजी चेअरमन शिवदास नाखवा, स्कूल कमिटीच्या चेअरमन गीता भगत, मुख्याध्यापिका प्रभू, इतर मान्यवर शिक्षक, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते गणपती व सरस्वतीचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये मार्च 2019मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. आमदार महेश बालदी  यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे विद्यालयासाठी लागणारी मदत केली जाईल, असे सांगितले. त्याचप्रमाणे आयओसीएलचे प्रबंधक अर्चित चक्रवर्ती यांनी विद्यालयासाठी आयओसीएलकडून मदत देण्याचे आश्वासन दिले. विद्यालयाच्या चेअरमन गीता भगत यांनी विद्यालय दिवसेंदिवस प्रगती करीत आहे. याचे श्रेय मुख्याध्यापिका प्रभू व सर्व शिक्षकांना आहे, असे सांगितले, तसेच विद्यालयास आमदार फंडातून मदत मिळावी, अशी अपेक्षा उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध नृत्ये सादर केली. यावर्षी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची थीम भारताच्या पश्चिमेकडील राज्यांच्या लोकनृत्याची होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply