Breaking News

महाडमध्ये कातकरी उत्थान अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड : प्रतिनिधी

रायगड जिल्हाधिकारी व महाड तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील भावे येथे आयोजित केलेल्या कातकरी उत्थान अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध दाखल्यांचे वाटप तसेच लसीकरण  करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यातील भावे येथे कातकरी उत्थान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड तसेच तहसीलदार सुरेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली या वेळी सप्तसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच आशा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तलाठी जी. के. तोडकरी यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. मोरे यांनी केले. या वेळी पिवळ्या रंगाच्या 22 व दुय्यम 25 शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे 14 जणांना सातबारा वाटप करण्यात आले. 42 जात प्रमाणपत्र व 32 नवीन मतदार नोंदणी करण्यात आली आहे शिवाय ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा लोकांची नाव नोंदणी करण्यात आली. या वेळी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अंकुश जाधव, तलाठी अतुल कांबळे, डिंपल चव्हाण, बी. बी. जाधव, रुपेश सावंत, दशरथ घोगरे, कृषी सहाय्यक एस. बी. चव्हाण आदींनी प्रयत्न केले. भावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच भारती तांबे, तंटामुक्त गाव अध्यक्ष भीमराव तांबे, चंद्रकांत मालुसरे, श्रीकांत मालुसरे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अनिकेत चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply